esakal | Vidhan Sabha 2019 : कणकवलीत उद्धव ठाकरे यांची राणेवर आगपाखड
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray in Kankavali

इकडे - तिकडे वाकवा मान आणि म्हणे स्वाभीमान अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार नारायण राणे यांचे नाव न घेता टीका केली. तसेच माझ्या युतीतला मिठाचा खडा मी वेळेवर बाहेर काढणार, असा इशाराही यावेळी श्री. ठाकरे यांनी दिला. 

Vidhan Sabha 2019 : कणकवलीत उद्धव ठाकरे यांची राणेवर आगपाखड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली - इकडे वाकवा मान, तिकडे वाकवा मान आणि म्हणे स्वाभीमान अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांचे नाव न घेता टीका केली. तसेच माझ्या युतीतला मिठाचा खडा मी वेळेवर बाहेर काढणार, असा इशाराही यावेळी श्री. ठाकरे यांनी दिला. 

कणकवली येथील गडनदी सभास्थळी श्री. ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर खासदार विनायक राऊत झिंदाबाद.., झिंदाबाद शिवसेना झिंदाबाद..घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. सभास्थळी शिवसैनिकांची अलोट गर्दी झाली आहे. ग्रामीण भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सभेसाठी आले होते.

श्री. ठाकरे म्हणाले, कणकवलीत विधानसभा शिवसेना उमेदवार याला विजयी करण्यासाठी मी येथे आलो आहे. कणकवलीमधून चांगला उमेदवार दिला असता तर मी उमेदवार दिला नसता, असेही श्री. ठाकरे म्हणाले. तसेच नारायण राणे यांना भाजपमध्ये घेतल्या बद्धल शुभेच्छाही दिल्या.

श्री ठाकरे म्हणाले, खुनशी व्यक्ती विरूद्ध माझा लढा आहे. जमिनी हडप करण्याचे माझे काम नाही. रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, श्रीधर नाईक यांचे काय झाले?  हे राणे यांना माफ करणार आहेत का ? असा सवालही त्यांनी केला. 

यावेळी श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत संदेश पारकर, माजी जिल्हा परिषद संग्राम प्रभुदेसाई, पंचायत समिती सभापती लक्ष्मण रावराणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष गिरीधर रावराणे, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, विलास कोरगावकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. 

कणकवली येथील विधानसभा मतदारसंघाचा विजय हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून हे स्वप्न शिवसैनिकांनी पूर्ण करावे, असे भावनिक आवाहन शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले. दरम्यान राणेंबरोबर शिवसेना सोडली, ही माझी मोठी चूक होती असेही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 मी राणेंना सोडल्यानंतर मला गद्दार असे म्हणणाऱ्या लोकांनी २००५ आणि २००१७ मध्ये आपण जी भूमिका घेतली. त्याला काय म्हणावे, असाही प्रश्न यावेळी सावंत यांनी उपस्थित केला. 

यावेळी संदेश पारकर, अतुल रावराणे, उदयोगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, आमदार वैभव नाईक यांची भाषणे झाली. 

loading image