Dapoli News : ठाकरे गटाला दुसरा धक्का! दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचा एकनाथ शिंदे गटात पक्षप्रवेश

कोकणात ठाकरे गटाचे उपनेते व माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक दुसरा धक्का बसला.
eknath shinde and former mla sanjay kadam
eknath shinde and former mla sanjay kadamsakal
Updated on

दापोली - कोकणात ठाकरे गटाचे उपनेते व माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक दुसरा धक्का बसला असून दापोलीचे माजी आमदार व ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय कदम आज (ता. १८) सायंकाळी ४ वाजता मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोकणचे नेते रामदास कदम व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेना उपनेतेपदी म्हणून माजी आमदार संजयराव कदम यांची तर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी माजी सभापती किशोर देसाई यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि शिवसेना नेते मा. रामदासभाई कदम, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेशदादा कदम, माजी आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील या विशेष कार्यक्रमात देण्यात आले.

गेले कित्येक दिवस संजय कदम यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू होती त्यानंतर संजय कदम यांनीही माध्यमांजवळ बोलताना शिवसेना पक्षप्रवेशाचे पक्ष स्पष्ट संकेत दिले होते. राजकारणात कधीही कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो अथवा कधीही कोणीही कायमचा मित्र नसतो याचाच प्रत्यय पुन्हा एकदा दापोली मतदारसंघात पाहायला मिळला आहे.

सध्या दापोली मतदारसंघात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यामुळे कट्टर राजकीय शत्रू असलेले दोन्ही कदम आता पुन्हा एकत्र काम करणार आहेत. एकेकाळचे रामदास कदम यांचे उजवे हात असलेले माजी आमदार संजय कदम पुन्हा एकदा रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वात स्वगृही परतले आहेत. याचा मोठा फायदा दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला होणार आहे.

संजय कदम हे दापोली विधानसभा मतदार संघाचे उध्दव गटाचे पराभूत उमेदवार होते. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी मोठा विजय मिळवला होता. तर शिवसेना ठाकरे गटाच्या संजय कदम यांचा पराभव झाला होता. त्यानंतर रामदास कदम व संजय कदम यांच्यातील राजकीय वाद आता मिटले असून शिमगोत्सवानंतर आता कोकणात राजकीय धुळवड पाहायला मिळत आहे.

खेड तालुक्यातील चिंचघर येथील असलेले संजय कदम यांनी सरपंच पदापासून आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद ही भूषवलं होतं. दरम्यान त्यावेळी त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळू शकल नाही.

याच मुद्द्यावरून त्यांचे शिवसेनेचे तत्कालीन माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याबरोबर त्यांचे बिनसले होते. यावरूनच त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यानंतर ते २०१४ साली सूर्यकांत दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवून दापोली मतदारसंघाचे आमदार झाले.

त्यानंतर २०१९ मध्ये व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दोन वेळा आमदार योगेश कदम यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. आता संजयराव कदम पुन्हा शिवसेनेत परतले असल्याने एककाळचे ते रामदास कदम यांचे उजवे हात म्हणून ओळखले जात होते. पक्ष सोडल्यानंतर रामदास कदम व संजय कदम यांच्यात टोकाच राजकीय वैमनस्य निर्माण झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com