Loksabha 2019 : उद्धव ठाकरे यांची कणकवलीत उद्या सभा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

एक नजर

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा.
  • गुरुवारी (ता. १८) कणकवलीत होणार प्रचार सभा.
  • उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात सायंकाळी पाचला सभा.

कणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी (ता. १८) कणकवलीत प्रचार सभा घेणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात सायंकाळी पाचला ही सभा होईल. 

या सभेत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.  

श्री. राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी कोकण दौऱ्यावर आहेत.  सकाळी अकराला देवरूखमध्ये त्यांची सभा होईल. तर सायंकाळी पाच वाजता संकरित सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आले आहे. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यातील राजकीय संघर्ष पाहता ते कणकवलीच्या सभेत काय बोलणार याची उत्सुकता मतदारांना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray sabha in Kankavali