esakal | गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackray

प्राप्त डोस दोन दिवसांत नागरिकांना द्यावेत, अशा सूचना सामंत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांस दिल्या आहेत.

गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मदतीने १ लाख ४० हजार कोविड डोस प्राप्त झाले आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. गणेशोत्सव हा कोकणवासीय दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. (konkan news)

कोरोनाची (covid -19) स्थिती लक्षात घेऊन आणि गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेऊन मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लसीकरणासाठी लसींच्या अधिक कोविड डोसची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी आज रत्नागिरीसाठी ७० हजार तर सिंधुदुर्ग साठी ६९ हजार डोस दिले आहेत.

हेही वाचा: चिपळूणमध्ये 25 जवानांसह NDRF ची टीम दाखल

मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कोकणवासीयांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, अशा शब्दात मंत्री सामंत यांनी यावेळी भावना व्यक्त केली. प्राप्त डोस दोन दिवसांत नागरिकांना द्यावेत, अशा सूचना सामंत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांस दिल्या आहेत. ही लस प्राप्त होण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम व आमदार भास्कर जाधव यांनीही प्रयत्न केले आहेत.

loading image
go to top