रत्नागिरी : राष्ट्रवादीच्या 'या' ज्येष्ठ नेत्याच्या सुपुत्रांचा शिवसेनेत प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 September 2019

रत्नागिरी - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (कै.) उमेश शेट्ये यांच्या दोन सुपुत्रांनी रविवारी (ता.1) म्हाडाध्यक्ष उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रभागातील विकासकामांना चालना मिळण्यासाठी शिवसेनेचा मार्ग स्वीकारल्याचे शेट्ये बंधूंनी पत्रकारांना सांगितले. त्यांच्या निर्णयाचा फटका शहर विकास आघाडीला बसण्याची शक्‍यता आहे. 

रत्नागिरी शहराचे माजी नगराध्यक्ष असलेल्या उमेश शेट्ये यांनी रत्नागिरी शहरावर आपली पकड मजबूत केली होती. शहरातील कोणत्याही प्रभागात उभे राहून निवडून येणारे ते एकमेव नगरसेवक होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांचे दोन्ही सुपुत्र राष्ट्रवादीत होते. उज्ज्वला शेट्ये, कौशल्या शेट्ये या राष्ट्रवादीच्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत; परंतु त्यांच्या प्रभागातील विकासकामांना चालना मिळत नसल्याने शेट्ये बंधूनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

केतन, वक्रतुंड शेट्येंचा पक्षात सन्मान केला जाईल. त्यांच्या सर्व इच्छा शिवसेना पूर्ण करेल. आपण स्वतः शेट्ये कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शेट्ये बंधूबरोबर प्रसन्न उफ बापू बिर्जे, रोहन वरेकर, नीलेश निवळकर, सायली निवेंडकर, राजू महाकाळ, गणेश जाधव आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umesh Shete sons enters in Shivsena