Sateli-Bhedshi: अनधिकृत प्रशिक्षण देणारे ताब्यात; साटेली-भेडशीत दोन तलवारी जप्त, ग्रामस्थांमुळे प्रकार उघड..

साटेली भेडशी थोरले भरड येथे एका अनधिकृतरीत्या बांधलेल्या घरात काही दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांना व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या.
Police officials displaying the two swords seized during a raid on an unauthorized training camp in Sateli-Bhedshi.
Police officials displaying the two swords seized during a raid on an unauthorized training camp in Sateli-Bhedshi.Sakal
Updated on

दोडामार्ग : साटेली भेडशी थोरले भरड येथे एका अनधिकृत इमारतीत मुलांना शस्त्र चालवण्याचे तसेच मकतबचे बेकायदेशीर प्रशिक्षण दिले जात असल्याचा प्रकार हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व स्थानिकांनी उघड केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना दोन तलवारींसह ताब्यात घेतले. या ठिकाणी सात ते दहा वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकरणी बिलाल आलम शेख (वय ३८, मूळ रा. बिहार) व असलम इस्माईल खेडेकर (४४, रा. साटेली भेडशी) या दोघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशीः साटेली भेडशी थोरले भरड येथे एका अनधिकृतरीत्या बांधलेल्या घरात काही दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांना व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी याचा छडा लावण्याचे ठरवले. तेथे सात ते दहा वयोगटातील मुलांना ऊर्दू, अरबीचे तसेच शस्त्र चालवण्याचे व मकतबचे बेकायदेशीर प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा व स्थानिकांचा होता. त्यांनी हा प्रकार येथील पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला.

त्यानुसार पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व अन्य सहकारी कर्मचाऱ्यांनी इमारतीची झडती घेतली. तेथे दोन तलवारी आढळल्या. मकतबीतून सात ते दहा वयोगटातील मुलांना ऊर्दू व अरबीचे शिक्षण दिले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी तेथील असलम खेडेकर व बिलाल शेखला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले.
दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत हिंदू संघटनांचे कार्यकर्ते, स्थानिक व मुस्लिम बांधवांनी याबाबत आवाज उठवत तहसील कार्यालयात धाव घेतली. सुमारे २०० ते ३०० च्या जमावाने तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला. तालुक्यात अशा घटना भयानक आहेत. भविष्यात आमच्या जीवितास धोका निर्माण होणाऱ्या अशा प्रकारांना प्रशासनाने आळा घातला पाहिजे.

प्रथमतः ती इमारत अनधिकृत आहे. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता ती कशी उभारली, ती एका संस्थेकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली असून तेथे असे प्रशिक्षण दिले जात आहे, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जमावाने लावून धरली. गुन्हे दाखल करणार नाहीत, तोपर्यंत तहसीलदारांच्या दालनातून आम्ही उठणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यावर सुमारे दोन तास चर्चा सुरू होती. शेवटी प्रांत हेमंत निकम यांनी दोडामार्ग तहसील कार्यालयात येत सर्व प्रकाराची पडताळणी केली आणि कारवाईचे आदेश तहसीलदारांना दिले. त्यानुसार पोलिसांनी त्या दोघांवर शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक खोपडे यांनी दिली. साहाय्यक पोलिस निरीक्षक भगत तपास करत आहेत.

तहसीलदार यांनी दिलेले आदेश
* साटेली भेडशी सरपंचांनी इमारतीमधील पाणी कनेक्शन तत्काळ तोडावे
* महावितरणने वीज कनेक्शन तोडून कार्यालयाकडे अहवाल द्यावा
* दोडामार्ग पोलिस निरीक्षकांनी संबंधित इमारतीचा ताबा घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी आवश्यक बंदोबस्त नेमावा

ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी न घेता संबंधित इमारत अनधिकृतरीत्या बांधलेली आहे. त्यात बेकायदेशीर शस्त्रे सापडत असतील तर ते समाजासाठी धोकादायक आहे. त्यामुळे ती इमारत प्रशासनाने तत्काळ जमीनदोस्त करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
- छाया धर्णे, सरपंच, साटेली-भेडशी

दोडामार्ग तालुक्यात स्थानिक मुस्लिम व हिंदू बांधव एकोप्याने नांदतो; मात्र, बाहेरून आलेल्या अन्य मुस्लिमांमुळे वेगवेगळे प्रकार घडतात. त्यांना आमचा कायमच विरोध राहणार आहे. मात्र, ते याला जुमानत नाहीत. अशी कृत्ये करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.
- इस्माईल चांद, ग्रामपंचायत सदस्य, साटेली भेडशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com