
-राधेश लिंगायत
दापोली : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश परिस्थितीमुळे यंदा मे महिन्यातच मुसळधार पाऊस पडला. त्याचा फटका मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध दापोली तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. ऐन सुटीच्या हंगामात पंधरा दिवस अगोदरच मासेमारी आणि पर्यटन हे दोन्ही व्यवसाय बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. त्यामुळे सुमारे ५० कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे.