
पाली : मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आणि हा अवकाळी मुसळधार पाऊस थांबायचे नाव घेत नाही आहे. परिणामी ठिकठिकाणी आता धबधबे वाहू लागले असून उन्हाळ्यात पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहे. ताम्हिणी घाट, सुधागड व इतर डोंगराळ प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात धबधबे वाहताना दिसत आहेत.