प्रिया अवसारे यांना ''ऊर्जा भूषण'' पुरस्कार

प्रिया अवसारे यांना ''ऊर्जा भूषण'' पुरस्कार

swt118.jpg
M89351
रत्नागिरीः प्रिया अवसारे यांना पुरस्कार देऊन गौरविताना परेश भागवत व अन्य.

प्रिया अवसारे यांना
‘ऊर्जा भूषण’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः महावितरणच्या कोकण परिमंडळाच्या वतीने कणकवली विभागाचे उच्चस्तरीय लिपिक प्रिया अवसारे यांना ‘ऊर्जा भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोकण परिमंडळ मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या हस्ते रत्नागिरी येथे अवसारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अवसारे यांनी २०२३-२४ मध्ये वित्त व लेखा कर्मचारी म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात वीज ग्राहकांच्या मीटरचे अचूक वाचन करून त्यांना योग्य ते वीज देयक वितरण, ग्राहक तक्रारींचे वेळेत निरसन करून आवश्यक तेथे वीज देयक दुरुस्ती, मीटर वाचन करणारे ठेकेदार तसेच वीज देयक भरणा केंद्र यांच्या कामकाजावर सखोल दैनंदिन देखरेख व महावितरणच्या जमा महसूलाचे नियमानुसार व विहित वेळेत प्रत्यावर्तन, ग्रामीण भागातील वीज ग्राहकांच्या वीज देयक वसुलीसाठी नवीन वीज देयक भरणा केंद्र व वॉलेटची निर्मिती तसेच विद्युत पुरवठा बंद व चालू असलेल्या ग्राहकांच्या वीज देयकांची उच्चांकी वसुली ही सर्व कामे जबाबदारीने पार पाडली. त्यांच्या या गौरवास्पद कार्यामुळे त्यांना ‘ऊर्जा भूषण पुरस्कार २०२४’ देऊन गौरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com