खोखोसाठी केला सोशल मीडियाचा वापर, तीन लाखाची रक्कम जमा

social_media
social_media

साडवली : सोशल मिडीयाचा वापर फक्त सुप्रभात, शुभरजनीसाठी न करता संगमेश्वर तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणार्‍या वांझोळे सनगलेवाडीने सोशल मिडीया या प्रभावी ठरणार्‍या तंत्राचा वापर वाडीतील शाळेसाठी, मुलामुलींच्या खोखो खेळासाठी केला व तीन लाखाची रक्कम जमवून शाळा डीजीटल व खोखो खेळआंतरराष्ट्रीय स्तरावर नेवून ठेवला.

सनगलेवाडीचे मराठी शाळा शिक्षक सदानंद आग्रे यांनी या सोशल मिडीयाचा असा अनोखा वापर करुन नवीन तंञज्ञान ज्ञानासाठी आणि खोखो खेळासाठी वापरले व यासाठी संपुर्ण सनगलेवाडी ग्रामस्थांना एक चांगली सवय लावली व विकास घडवून आणला.

सदानंद आग्रे यांनी सनगलेवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळाचे सदस्य यांची बैठक घेवून सतत पाठपुरावा करुन सोशल मिडीयाचा वापर शाळेसाठी,खोखो खेळासाठीच करायचा असे बाळकडु पाजले.वाढदिवस,लग्नवाढदिवस याच्या केवळ शुभेच्छा न देता त्या त्या दिवशी शंभर रुपये गावासाठी जमा करायचे असा नियम केला.सनगलेवाडी दुर्गम भागात आहे,येथील मुलांना प्रगत करण्यासाठी आपण आपला निधी ऊभारु अशी हाक सदानंद आग्रे यांनी दिली.आणि या हाकेला ग्रामस्थांनी ओ दिली आणि हा आजपर्यंतचा तीन लाखाचा निधी उभा राहीला.

सदानंद आग्रे यांच्या पुढाकाराने देणगीदारही मिळत गेले. आज ही शाळा पूर्णपणे डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे.याच पैशातुन खोखो खेळासाठी मुलींना घडवण्यासाठी उपयोग केला गेला. जिथे खेळ असेल तीथे मुलींबरोबर पालकही मैदानाबाहेर प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहु लागले. शिक्षणासोबतच सनगलेवाडीने खोखो खेळात अव्वल स्थान पटकावले आहे.तेजस्विनी सनगले,पल्लवी सनगले या मुलींनी राष्र्टीय स्तरावरील सुवर्ण पदक मिळवण्याची कामगिरी केली आहे.या वाडीत 25 राजस्तरीय व 2 राष्ट्रीय खोखोपटु तयार झाले आहेत.

या मुली मुलांसाठी ग्रामस्थही आता तेव्हढीच मेहनत घेत आहेत.सोशल मिडीयाच्या माध्यमातुन खोखो साठी आणि शाळेसाठी निधी जमा होवु लागला आहे.खोखोसाठीच व शाळेसाठीच सोशल मिडीयाचा वापर करा असा जणु दंडकच घालुन देण्यात आला आहे.यासाठी वेगळी कमिटी तयार करण्यात आली आहे.त्यांनीच या निधिचा विनियोग करुन हिशोब ठेवायचा आहे असे ठरले आहे.सदानंदआग्रे यांनी सनगलेवाडीला आणि शाळेला खोखोच्या माध्यमातुन नवा आयाम मिळवुन दिला आहे.

सारे काही मिळाले खोखो खेळामुळे
सनगलेवाडी हा भाग दुर्गम..रस्ता नाही,त्यामुळे बससेवा नाही..सात की.मी.चे अंतर शाळेसाठी धावत यायचे हाच खोखोचा सराव बनला..यातुन 25 राज्यस्तरीय व २ राष्र्टीय खोखोपटु घडले...वाडीचे नाव जगाच्या नकाशावर गेले..खोखो खेळामुळे सनगलेवाडीचे नाव झाले..मुलामुलींच्या या यशामुळे शासन दरबार हलला आणि 3 कोटीचा रस्ता मंजुर झाला..आता खोखोचे मैदानही होणार आहे..विकासचक्रे खोखो खेळामुळे फिरु लागली आहेत...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com