esakal | रत्नागिरीत 18 ते 44 वर्षे गटासाठी या ठिकाणी लसीकरण केंद्र

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत 18 ते 44 वर्षे गटासाठी 'या' ठिकाणी लसीकरण केंद्र

रत्नागिरीत 18 ते 44 वर्षे गटासाठी 'या' ठिकाणी लसीकरण केंद्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयामध्ये 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आली असून मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी येथे कोव्हीशिल्ड लसीचे 1500 डोस, ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे कोव्हीशिल्ड लसीचे 1500 डोस, ग्रामीण रुग्णालय गुहागर अंतर्गत जीवन शिक्षण शाळा क्र.१ येथे कोव्हीशिल्ड लसीचे 1500 डोस, नगरपरिषद दवाखाना चिपळूण येथे कोव्हीशिल्ड लसीचे 1500 डोस, नगरपरिषद दवाखाना खेड येथे कोव्हीशिल्ड लसीचे 1500 डोस वाटप करण्यात आलेले आहे.

दिलेल्या लसीचा वापर पुढील सात दिवसांकरिता करावयाचा असून पहिले सहा दिवस प्रत्येक सत्राचे उद्दिष्ट 200 लाभार्थ्यांसाठी असून सातव्या दिवशी 300 लाभार्थ्यांना लसीकरण करावयाचे नियोजन करण्यात आले आहे. सदर लसीकरण मोहिम 02 मे 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.

सदर लसीकरण पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठीच असेल. सत्राच्या ठिकाणी ऑनस्पॉट रजिस्ट्रेशन करुन कोणत्याही लाभार्थीना लसीकरण करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Edited By- Archana Banage