

The activity encouraged students to identify traditional wild vegetables and understand the importance of conserving them.
Sakal
पाली : विद्यार्थ्यांना नैसर्गिक संपत्तीची ओळख व्हावी आणि त्यांच्या आरोग्याविषयी सजगता निर्माण व्हावी, या उद्देशाने शनिवारी (ता. 18) रजिप वाघोशी शाळेत 'आनंददायी शनिवार' अंतर्गत 'ओळख रानभाज्यांची' हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पावसाळ्याच्या सुरुवातीला निसर्गात आढळणाऱ्या वैविध्यपूर्ण रानभाज्यांचे मानवी आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.