स्वतःवरील आरोपांचे स्पष्टीकरण राणे देणार आहेत का?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 May 2019

सावंतवाडी - नारायण राणेंचे आत्मचरित्र दुसऱ्यांवर आरोप करण्यासाठी आहे; पण स्वतःवर झालेल्या आरोपांचे काय? याचे स्पष्टीकरण ते करणार आहेत, का असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून केला आहे.

माजी मुख्यमंत्री राणे आत्मचरित्र प्रसिद्ध करणार असल्याचे सगळ्यात आधी आमदार नीतेश राणे यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून जाहीर केले. यात ‘सबका हिसाब होगा’ असा उल्लेख केल्याने आत्मचरित्र बाबतची उत्कंठा अधिक वाढली. यात अर्थातच शिवसेनेबाबत बरेच खुलासे असतील, अशी चर्चा आहे. राणेंना शिवसेनेत ठेवणार असाल तर आपण घर सोडून जाऊ, अशी धमकी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिली होती, असा दावा राणेंनी यात केला असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये आहे. या पार्श्‍वभूमीवर आज नाईक यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरले.

नारायण राणेंवर झालेल्या आरोपांचे काय? त्याचे स्पष्टीकरण आत्मचरित्रात का नाही? श्रीधर नाईक हत्याप्रकरण, चेंबूरमधले गुन्हे, कोकणातले गुन्हे यावर राणेंनी स्पष्टीकरण का नाही दिले?
- वैभव नाईक, 

आमदार, शिवसेना

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaibhav Naik comment on Narayan Rane autobiography