वैभव नाईक,नितेश राणेंसह भाजप-शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हा दाखल

vaibhav naik,
nitesh rane
vaibhav naik, nitesh ranesakal
Updated on: 

कणकवली (सिंधुदुर्ग) : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान जमलेले नेते आणि कार्यकर्ते तसेच शिवसेना कार्यालयात जमलेले नेते, कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक तसेच भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे शहरप्रमुख सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांच्यासह चाळीस ते पंचेचाळीस जणांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर अतुल रावराणे नगरसेवक कन्हैया पारकर , राजू राठोड यांच्यासह पंधरा ते वीस जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 35 तसेच कलम 188, 143 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Summary

सिंधुदुर्गात मनाई आदेशाचे उल्लंघन; दोन्ही पक्षाच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर ठाण्यात गुन्हा दाखल

नारायण राणे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात झालेल्या जमाव तसेच शिवसेना कार्यालयातील कार्यकर्त्यांची रात्री उशिरापर्यंत असलेल्या गर्दीमुळे जिल्हाधिकार्‍यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे येथील पोलिसात मध्यरात्री उशिराने भाजप आणि शिवसेनेचे नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

vaibhav naik,
nitesh rane
शिवसेना-भाजप शत्रू नाहीत, तर राजकीय विरोधक ; आशिष शेलार

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली. .यावेळी भाजप कार्यकर्ते तसेच शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाव्हायरस साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक कलम लागू आहे. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. आगामी काळातील यात्रा, उत्सव, जाहीर सभा आंदोलन या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सात सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश लागू केला होता. मात्र या मनाई आदेशाचे उल्लंघन भाजप आणि शिवसेनेच्या नेते , कार्यकर्त्याकडून झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील पोलिसांनी उशिराने मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची माहिती पुढे आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com