वैभववाडीत भाजपचे वर्चस्व; शिवसेनेला चार जागा

एकनाथ पवार
Tuesday, 19 January 2021

चिठ्ठीवर शिवसेनेचा उमेदवार निवडुन आला तर नाधवडे आणि कुभंवडेमध्ये प्रत्येकी एक एक उमेदवार एका मताने विजयी ठरले आहेत. 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील बारा ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायतीवर भाजपने तर 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले. भाजपच्या ताब्यातील दोन ग्रामपंचायती शिवसेनेने मिळविल्या तर शिवसेनेच्या ताब्यातील एका ग्रामपंचायतीवर भाजपने कब्जा मिळविला. आर्चिणेमध्ये एक जागेसाठी दोन उमेदवारांना समान मते मिळाली. तेथे चिठ्ठीवर शिवसेनेचा उमेदवार निवडुन आला तर नाधवडे आणि कुभंवडेमध्ये प्रत्येकी एक एक उमेदवार एका मताने विजयी ठरले आहेत. 

तालुक्‍यात भाजपने वर्चस्व मिळविले असले तरी शिवसेनेनेही जोरदार मुसंडी मारली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते फटाक्‍यांच्या आतषबाजीत जल्लोष करीत होते. तालुक्‍यतील 12 ग्रामपंचायतीच्या 70 जागांसाठी आज येथील तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या सुरूवातीलाच भाजपला जोरदार झटका बसला.

पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे यांच्या ताब्यात अनेक वर्षे असलेली सोनाळी ग्रामपंचायतीच्या सातपैकी 5 जागा शिवसेनेने मिळवित एकहाती विजय मिळविला. त्यानंतर कधी भाजप तर कधी शिवसेनेचा विजय होत होता. अटीतटीची ठरलेली आर्चिणे ग्रामपंचायत भाजपने राखली तर खांबाळेत पुन्हा एकदा शिवसेनेने सर्व जागा मिळवित गड राखला. कोकिसरे, नाधवडे या ग्रामपंचायती भाजपने राखल्या आहेत. विजयानंतर गावोगावी विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये 5-4, 4-3 अशा लढती झाल्या. काही अपवाद वगळता सर्वत्र चुरशीच्या लढती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

सविस्तर निकाल असा ः 
नाधवडे - प्रभाग 1- गोपाळ कोकाटे (276), सूर्यकांत कांबळे (222), शैलजा सुतार (266). प्रभाग 3 ः रोहित पावसकर (353), दीपाली पार्टे (357). सोनाळी ः प्रभाग 1 महेश सुतार (144), श्रेया कदम (204), निकीता शेलार (150, विजयी). प्रभाग 2 भीमराव भोसले (133), अशोक चव्हाण (122). प्रभाग-3 ः दिपाली नेमण (मते 93, विजयी), मेधा नेमण (मते 82 पराभुत), सुवर्णा तळेकर (मते 94 विजयी), प्राजक्ता पालकर (मते 78 पराभुत).

आर्चिणे ः प्रभाग 1- सुहास गुरव (मते 173 विजयी), श्रीकृष्ण सुतार (150 पराभुत), सारीका रावराणे (मते 173, विजयी), शर्वरी कदम (मते 162 (चिठ्ठीवर विजयी), अरूणा कदम (मते 262 चिठ्ठीवर पराभुत), स्नेहलता रावराणे (मते 150, पराभुत). प्रभाग 2-सारीका कडु (मते 173 विजयी), संजना बोडके (मते 157, पराभुत), सविता कडु (मते 175, विजयी), चंद्रभागा मोरे (मते 159, पराभुत), महेंद्र रावराणे (मते 174, विजयी), सुशीलकुमार रावराणे (मते 159, पराभुत),

प्रभाग 3-सुवर्णा रावराणे (मते 159, विजयी), अमृता रावराणे (मते 147, पराभुत), रूपेश रावराणे (मते 160, विजयी), वासुदेव रावराणे (मते 131, विजयी), पंडित रावराणे (मते 53, पराभूत), युवराज रावराणे (मते 118), रोहन रावराणे (मते 126), उत्तम सुतार (मते 56 पराभुत). लोरे ः प्रभाग 1- विनोद पेडणेकर (मते 303 विजयी), राजेश कदम (मते 101 पराभुत), रितेश सुतार (मते 288 विजयी), धाकोजी सुतार (मते 139 पराभुत), सुप्रिया रावराणे (मते 307 विजयी), रविना आग्रे (मते 115 पराभुत).

प्रभाग 2- निकीता आग्रे (मते 271 विजयी), संगीता कदम (मते 274 विजयी), मानसी गोसावी (मते 136), विजय मांजलकर (मते 104 पराभुत), विलास नावळे (मते 311 विजयी), तुकाराम मोरे (मते 78 पराभुत). प्रभाग 3-सुरेखा शिवगण (मते 206 विजयी), वैदही मांजलकर (मते 166 पराभुत), शुभांगी कुडतकर (मते 198 विजयी), शुभांगी आग्रे (मते 171 पराभुत), दिपक पाचकुडे (मते 239 विजयी), विजेंद्र रावराणे (मते 134 पराभुत). 

कुभंवडे ः प्रभाग एक-सुरेखा चव्हाण (मते 92 विजयी), सारीका शिंदे (मते 28 पराभुत),नंदकुमार शिंदे (मते 84 विजयी), परशुराम आमकर (मते 37,पराभुत). प्रभाग 3-विनोद कदम (मते 64 विजयी), संतोष जाधव (मते 63 पराभुत), चैताली चाळके (मते 73 विजयी), छाया जाधव (मते 49 पराभुत). 

कोकिसरे ः प्रभाग 1-प्रमोद जाधव (मते 254,विजयी), सुधीर जाधव (मते 117), अनंत नेवरेकर (149 दोन्ही पराभुत), सोनाली पवार (मते 263 विजयी), अरूणा वळंजु (मते 253 पराभुत), दत्ताराम सावंत (मते 315 विजयी), तुकाराम वळंजु (मते 144), विश्‍वनाथ मेस्त्री (मते 59 दोन्ही पराभुत). प्रभाग 2 ः लक्ष्मी म्हेत्तर (मते 196 विजयी), स्वरूपा मेस्त्री (मते 188 पराभुत), वैशाली कुडाळकर (मते 201 विजयी), स्मिता गुरव (मते 194 पराभुत), प्रकाश पाचांळ (मते 203 विजयी), महेश राशिवटे (मते 140 पराभुत). प्रभाग 4-समिक्षा पाटणकर (मते 155 विजयी), राजेश्री पोटफोडे (मते 129 पराभुत), अवधुत नारकर (मते 221 विजयी), दिलीप नारकर (मते 188 पराभुत). 

वेंगसर ः प्रभाग 1-विलास पावसकर (मते 105 विजयी), परशुराम पावसकर (मते 64 पराभुत). ग्रामपंचायत ऐनारी ः वैशाली जाधव (मते 102 विजयी), रविना सुर्वे (मते 73 पराभुत), संजय कांबळे (मते 92 विजयी), जर्नादन विचारे (मते 81 पराभुत). प्रभाग 3-विश्राम साईल (मते 50 विजयी), प्रतिभा साईल (मते 49 पराभुत).

ग्रामपंचायत सांगुळवाडी ः प्रभाग 1-गौरी रावराणे (मते 188 विजयी), सुप्रिया रावराणे (मते 56 पराभुत), बाळाजी रावराणे (मते 193 विजयी), स्वप्निल रावराणे (मते 51 पराभुत). ग्रामपंचायत भुईबावडा ः प्रभाग 1-वैशाली शिंदे (मते 116 विजयी), संतोषी गुरव (मते 68 पराभुत), बाजीराम मोरे (मते 123 विजयी), प्रमोद मोरे (मते 57 पराभुत). प्रभाग 3-मोहीनी कांबळे (मते 189 विजयी), प्रल्हाद कांबळे (मते 80 पराभुत), सानिका वारंगे (मते 198 विजयी), प्रशांत नारकर (मते 75 पराभुत), श्रेया मोरे (मते 193 विजयी), शीतल भुर्के (मते 80 पराभुत).

ग्रामपंचायत खांबाळे ः प्रभाग 1-मंगेश गुरव (मते 258 विजयी), अनंत हिंदळेकर (मते 119 पराभुत), रसिका पवार (मते 233 विजयी), रेश्‍मा परब (मते 143 पराभुत), प्रवीण गायकवाड (मते 250 विजयी), एकनाथ पवार (मते 126 पराभुत). प्रभाग 2-प्राजक्ता कदम (मते 189 विजयी), दर्शना मोरे (मते 179 विजयी), शुभांगी पवार (मते 102) आणि सुप्रिया कांबळे (मते 111) दोन्ही पराभुत, गणेश पवार (मते 200 विजयी), लवु पवार (मते 92). प्रभाग 3-भारती बोडेकर (मते 156 विजयी), सायली बोडेकर (मते 93), गौरी पवार (मते 158 विजयी), मनिषा मोहीते (मते 92 पराभुत), अमोल चव्हाण (मते 166 विजयी), विश्‍वनाथ मोहीते (मते 84).

ग्रामपंचायत एडगाव ः प्रभाग 1 ः प्रज्ञा रावराणे (मते 210 विजयी), स्मृती पवार (मते 181 विजयी), अक्षता रावराणे (मते 65 पराभुत), रवींद्र रावराणे (मते 180 विजयी), बच्चाराम रावराणे (मते 67 पराभुत). प्रभाग 2-दत्ताराम पाष्टे (मते 150 विजयी), शुभदा साळसकर (मते 42 पराभूत). प्रभाग 3-सायली घाडी (मते 102 विजयी), शुभदा साळसकर (मते 15 पराभुत), वैष्णवी रावराणे (मते 88 विजयी), उमा रावराणे (मते 25 पराभूत). 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vaibhavwadi gram panchayat election konkan sindhudurg