Raigad: मुसळधार पावसामुळे वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प; अंबा नदीच्या पुलाचा जोडरस्ता व वाकण नाक्यावरील रस्ता पाण्याखाली;भेरव पुलावरून पाणी

Heavy Rain Disrupts Traffic on Vakan-Pali-Khopoli Highway: रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.अंबा नदीच्या पुलावरील जोडरस्ते पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने वाहतूक बंद करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
Raigad

Raigad

esakal

Updated on

अमित गवळे

पाली: सुधागड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलाच्या जोडरस्त्यावर दोन्ही बाजूला सखल भागात पाणी भरले. यामुळे वाकण आणि खोपोली बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. परिणामी प्रवासी आणि वाहनचालकांचे मोठे हाल झाले. सुदैवाने रविवारची सुट्टी असल्याने विद्यार्थी व चाकरमान्यांची मोठी गैरसोय टळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com