esakal | कोरोना चाचणीची वैधता आता 10 दिवसच

बोलून बातमी शोधा

covid 19
कोरोना चाचणीची वैधता आता 10 दिवसच
sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या होत आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोरोना आणि विषाणू चाचणी प्रयोगशाळेची क्षमता 1200 आहे. आणखी 400 युनिट वाढविण्याचा प्रयत्न आहे. मात्र जी कोरोना चाचणी केली जाईल. त्याची वैधता 10 दिवसच राहणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

सामंत म्हणाले, कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने त्याचे रिपोर्ट मिळण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. काही केंद्रावर त्यामुळे गर्दी होत असेल तर त्यांना ऑनलाईन रिपोर्ट देण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. सर्व ठिकाणी जिल्हा प्रशासन पुरे पडेल असे होणार नाही. नारिकांचीही काही जबाबदारी आहे. जिल्ह्यात नाहक फिरणार्‍या व्यक्तींची आरटीपीसीआर आणि अ‍ॅण्टीजेन चाचणीही करण्यात येणार आहे. एका चाचणी केल्यास त्याची वैधता 10 दिवस आहे. दोन डोस घेतलेल्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

लसीकरणावर आम्ही भर दिला आहे. लसीचे दोन डोस घेऊन झाले तरी लोकांची अ‍ॅण्टीजेन टेस्ट होणार आहे. कारण जिल्हाधिकार्‍यांनी दोन डोस घेऊनही ते बाधित झाले. मात्र त्याचा शरीरावर फारसा परिणाम होत नाही. बेड कमी पडू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट येथेही कोरोना बाधितांचे विलगीकरण करता येणार आहे. त्यासाठीचे दर जिल्हा प्रशासन निश्‍चित करणार आहे. रुग्ण संख्या अधिक आणि कर्मचार्‍यांची कमी संख्या आहे. त्यासाठी थेट मुलाखती घेऊन नियुक्या दिल्या जात आहेत. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आमदार राजन साळवी, भास्कर जाधव यानी कोल्हापूर, पुणे येथील काही एजन्सीशी चर्चा करून त्यांच्याकडुन जादा कर्मचारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. खासगी डॉक्टरांची मदत घेतली जात आहे.

...तर चिरेखाण सुरू करणार

चिरेखाण सुरू करण्याबाबत आजच आमची बैठक झाली. त्यामध्ये चिरेखाण कामगार तिथेच राहतात असतील आणि तसा अहवाल प्रशासनाला आल्यास चिरेखाणी सुरू केल्या जातील.

Edited By- Archana Banage