आचरा - हिर्लेवाडी येथील खारलॅंड बंधाऱ्याची झडपे तुटली 

The valves of the Kharland dam broke In Achara Hirlewadi In Sindhudug
The valves of the Kharland dam broke In Achara Hirlewadi In Sindhudug
Updated on

आचरा ( सिंधुदुर्ग ) - आचरा - हिर्लेवाडी येथील शिवापूर खारलॅंड बंधाऱ्याची झडपे तुटून चार महिने झाले आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांची तसेच शिवापूर सोसायटीची सुमारे दिडशे एकर शेतजमिन खारपड होऊन नापिक होण्याची भीती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. खारलॅंड अधिकारी वेल्लार यांच्याशी संपर्क साधल्यावर टेंडर प्रक्रिया होत नसल्याने काम रेंगाळले होते; मात्र येत्या आठ दिवसात हिर्लेवाडी येथील शिवापूर बंधाऱ्याला झडपे बसविण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

खाडी किनारपट्टीलगत असलेल्या हिर्लेवाडी येथील खारलॅंड बंधाऱ्याची झडपे तुटून गेल्याने येथील शेतकऱ्यांची आणि शिवापूर सोसायटीची शेतजमीन खारपड होण्याची भीती निर्माण झाली आहे. खाऱ्या पाण्यामुळे माडबागायत मरुन जाऊ लागली आहे. पिण्याच्या पाण्याच्या विहीरीचे पाणी खारे होऊ लागले आहे. यामुळे येथील शेतकरी व शिवापूर सोसायटीचे विनोद मुणगेकर, वराडकर आदींनी खारभूमी कार्यालय कणकवली येथे संपर्क साधून, पत्रव्यवहार करून ही बाब संबंधीतांच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रयत्न केले गेले; पण संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसून कोरोनाचे कारण पुढे करून वेळ काढूपणा केला जात असल्याचे मुणगेकर यांचे म्हणणे आहे. आठ दिवसांपूर्वी ठेकेदाराला वर्क ऑर्डर काढल्याचे अधिकारी सांगत असले तरी ठेकेदार वर्कऑर्डर मिळाली नसल्याचे सांगत असल्याचे मुणगेकर सांगितले. 

निदान झडपे बसविण्यास वेळ लागत असलातरी चिखल फळ्या टाकून खार पाणी अडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यास हरकत नव्हती; पण त्याबाबतही एका बोगद्याला केवळ फळ्या बसविण्यात आल्या असून त्यावर अजूनही माती टाकली नसल्याचे मुणगेकर यांचे म्हणणे आहे. यामुळे खारभूमी विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा मुणगेकर यांनी दिला आहे. 

याबाबत खार भूमी विभागाचे वेल्लार यांच्याशी संपर्क साधल्यावर टेंडर प्रक्रिया होत नसल्याने झडपे बसविण्याचे काम रेंगाळले असल्याचे सांगून आता प्रक्रिया करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत आचरा हिर्लेवाडी येथील खार बंधाऱ्याला झडपे बसविली जाणार असल्याचे सांगितले. येथील केवळ एकाच बंधाऱ्याला चिखल फळी बसवली जाते. बाकीच्या ठिकाणी झडपे बसविण्यात येतात. त्यामुळे लाकूड सामान उपलब्ध नसल्याने फळी लावण्यास दिरंगाई झाली होती. आता ती बसविण्यात आली असून फक्त माती टाकण्याचे काम शिल्लक राहिल्याचे त्यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com