सात जन्माचे धागे बांधले कोविड केअर सेंटरमध्ये

सात जन्माचे धागे बांधले कोविड केअर सेंटरमध्ये
Updated on: 

रत्नागिरी : "वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य लाभो तुला, जन्मोजन्मी असाच तुझा सहवास लाभो मला" या पंक्तीनुसार कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक(dr. babasaheb aamedkar) न्याय भवन येथे महिलांनी आज ता. २४ रोजी वडाचे पूजन करून आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य मागितले. कोविड आजार विसरून त्यांनी वटपौर्णिमा (vatpoornima) साजरी केली. (vatpoornima-celebrated-at-covid-care-center-kokan-marathi-news)

सामाजिक न्याय भवन येथील कोविड सेंटर मध्ये देखील आज वटपौर्णिमा साजरी केली गेली. झालेला आजार विसरून आपल्या पतीसाठी दीर्घायुरारोग्य लाभावे, यासाठी कोविड सेंटर मधील महिलांनी वडाची पूजा केली. या उपक्रमाला सहाय्य झाले ते गोगटे-जोगळेकर कॉलेजमधील सन २००० च्या बॅचचे माजी विद्यार्थी गणेश धुरी, समीर भोसले, प्रशांत सागवेकर, संदेश कांबळे, योगिनी सावंत, निता शिवगण आणि सहकारी विद्यार्थी, हेल्पिंग हँड आणि कोविड केअर सेंटर्समधील सर्व कर्मचाऱ्यांचे.

विशेष सहाय्य जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सौ. संघमित्रा फुले-गावडे आणि कोविड सेंटरमधील सर्व आरोग्य यंत्रणेने मदत केली. सुवासिनींना हे व्रत व्यवस्थित करता यावे, यासाठी गणेश धुरी यांनी विशेष मेहनत घेतली. दुपारी आणि रात्री उपवासाचा फराळ देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com