Environment Conservation Wave Village: वावे गावातील ग्रामस्थ व युवाशक्तीकडून रस्त्याच्या दुतर्फा १०० वृक्षांचे रोपण, पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम

वावे गावातील ग्रामस्थ व युवाशक्तीचा पर्यावरणपूरक उपक्रम; रस्त्याच्या दुतर्फा १०० वृक्षांची लागवड, संगोपनाची जबाबदारीही मनापासून स्वीकारली
The annual plantation drive reflects the village's commitment to protecting nature through tree plantation and long-term maintenance.

The annual plantation drive reflects the village's commitment to protecting nature through tree plantation and long-term maintenance.

Sakal

Updated on

पाली : वाढते शहरीकरण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल राखण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण पिढी आता पुढे येत आहे. याचाच एक आदर्श वस्तुपाठ सुधागड तालुक्यातील वावे गावाने घालून दिला आहे. ग्रामस्थ मंडळ वावे आणि वावे युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १९) परिसरात एका विशेष वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत वावे गाव ते सनशील्ड कंपनी आणि वावे गाव ते मजरे जांभूळपाडा बसस्टॉप दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा तब्बल १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com