
-अमित गवळे
पाली : कोकण इतिहास पत्रिका २०२५ मध्ये इतिहास संशोधक संदीप मुकुंद परब यांचा "पेशवेकालीन सुधागड तालुक्यातील मौजे उध्दर येथील श्री रामेश्वर देवालयाचे बांधकामकर्ते इनामदार वेदमूर्ती शिवरामभट चित्राव - एक अभ्यास" हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. या लेखात त्यांनी वेदमूर्ती शिवरामभट चित्राव यांचे कार्य आणि उध्दर येथील रामेश्वर देवालयाच्या बांधकामाशी संबंधित ऐतिहासिक माहिती दिली आहे.