esakal | वेळासमधील कासव महोत्सव रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

velas's Turtle Festival canceled Ratnagiri Marathi News

गेल्या दशकभरापासून वेळास जगाच्या नकाशावर आले ते तिथे येणाऱ्या ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांमुळे. आज ची ओळख "कासवांचे गाव' अशीच झाली आहे. येथील कासव महोत्सव पर्यटकांसाठी पर्वणी असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे महोत्सव रद्द करण्यात आला.

वेळासमधील कासव महोत्सव रद्द

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मंडणगड ः गेल्या दशकभरापासून वेळास जगाच्या नकाशावर आले ते तिथे येणाऱ्या ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांमुळे. आज ची ओळख "कासवांचे गाव' अशीच झाली आहे. येथील कासव महोत्सव पर्यटकांसाठी पर्वणी असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे महोत्सव रद्द करण्यात आला. 

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्‍यातील शेवटचं टोक म्हणजे वेळास! तीन बाजूने डोंगरांनी वेढलेल्या आणि एक चतुर्थांश भागात समुद्र किनाऱ्याने वेढलेले हे गाव आपल्या कुशीत अनेक ऐतिहासिक गुपित लपवून बसले आहे. ऐतिहासिक हिंमतगडाच्या बाजूला बाणकोट जवळून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या खाडीच्या दक्षिण तीरावर हे गाव वसलेले आहे. कासवांच्या संवर्धनाने ते जगाच्या पर्यटन नकाशावर आले आहे. 

कासवाची मादी समुद्र किनाऱ्यावर वाळूत अंडी घालते. परंतु काही प्राणी ही अंडी काढून खातात. नशिबाने काही पिल्ले बाहेर आली तर ती समुद्रापर्यंत पोहचता-पोहचता पक्षांची शिकार होतात. जी समुद्रात पोहचतात ती पिल्ले आणि कासव मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मरण पावतात. मादी साधारणतः 120-150 इतकी अंडी घालते. समुद्राच्या भरतीच्या रेषेत न येणारी जागा योग्य समजली जाते. 45-55 दिवसांनी त्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर ती समुद्रात सोडली जातात. संरक्षित केलेल्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याचा कालावधीत कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

3 मार्चपासून त्याची सुरवातही झाली होती. देश विदेशातून पर्यटक कासव महोत्सवाला यायला सुरू झाले होते. मात्र दरम्यान कोरोना महारोगाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने केंद्र व राज्य शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. वेळास येथील कासव महोत्सवावर कोरोना आजाराचे संकट उभे ठाकले. जगभरातून येणाऱ्या पर्यटक यामुळे वेळास ग्रामपंचायतीमध्ये 12 मार्चला झालेल्या ग्रामसभेत हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

loading image