

Cashew Variety
sakal
वेंगुर्ले : कोकणामधील ओल्या काजूगराची वाढती मागणी व ओल्या काजू बी मधून काजूगर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे सतत पंधरा वर्षांच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण ‘वेंगुर्ला-१० एमबी’ या नावाने लागवडीसाठी शिफारस केले आहे.