Vidhan Sabha 2019 : भाजप-शिवसेनेची युती नाही; भाजप जिल्हाध्यक्षांची माहिती

अनंत पाताडे
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

कणकवली - सिंधुदुर्गात भाजप शिवसेनेची युती नाही, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे स्पष्ट केले. कणकवलीच्या जागेवर शिवसेनेने भाजपच्या विरोधात उमेदवार दिल्याने जिल्ह्यात युती तुटल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

सिंधुदुर्गात शिवसेनेने युती धर्म पाळला नाही. कणकवलीच्या जागेवर शिवसेनेने आपला उमेदवार दिला आहे. सेनेकडून सतीश सावंत यांनी आज फॉर्म भरला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री जठार यांनी ही माहिती दिली. श्री. जठार म्हणाले, सावंतवाडीत विधानसभा मतदारसंघात राजन तेली यांना भाजपने जाहीर पाठिबा देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात दत्ता सामंत यांना भाजपने पाठींबा देखील जाहीर केला आहे. शिवसेनेच्या उमेदवारा विरोधात प्रचार करा, असे आदेश भाजप कार्यकर्त्यांना आज देण्यात आल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 No alliance in BJP Shivsena in Sindhudurg