Vidhan Sabha 2019 : भाजपचा एबी फॉर्म होता पण... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

सावंतवाडी - येथील प्रांत कार्यालयात आज राजकीय नाट्यमय घटना पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादीने दोन उमेदवारांचे अधिकृत एबी फॉर्मसह अर्ज दाखल केले. माजी आमदार राजन तेली यांनी काल (ता.3) अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. आज ते भाजपचा एबी फॉर्म घेऊन आले; मात्र भरला नाही. 

सावंतवाडी - येथील प्रांत कार्यालयात आज राजकीय नाट्यमय घटना पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादीने दोन उमेदवारांचे अधिकृत एबी फॉर्मसह अर्ज दाखल केले. माजी आमदार राजन तेली यांनी काल (ता.3) अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. आज ते भाजपचा एबी फॉर्म घेऊन आले; मात्र भरला नाही. 

येथील प्रांत कार्यालयात आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष बबन साळगावकर व पक्षनिरीक्षक अर्चना घारे - परब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले राजन तेली हे दुपारी तीन वाजता भाजपचा अर्ज दाखल करण्यासाठी आले; मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाचा एबी फॉर्म दाखल केला नाही. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तेली हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत हे स्पष्ट झाले असले तरी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत अनिश्‍चितता कायम आहे.

आज दिवसभर एकूण 11 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उमेदवारांची संख्या 21 झाली आहे. यात 3 अपक्ष आहेत. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपले दोन एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केले. 

कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार सतीश सावंत यांना शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यास आपणही भाजपचा एबी फॉर्म देणार, असा पवित्रा घेत राजन तेली यांनी दुपारी निवडणूक निर्वाचन अधिकारी कार्यालयात धाव घेतली; मात्र त्यांनी शेवटपर्यंत एबी फॉर्म सादर केला नाही. याबाबत राजन तेली यांच्याशी संवाद साधला असता जर शिवसेनेचा एबी फॉर्म सतीश सावंत यांनी दाखल केला असता तर आपणही भाजपचा एबी फॉर्म देणार होतो; मात्र शेवटपर्यंत सावंत यांनी एबी फॉर्म दाखल केल्याचे कळले नाही. त्यामुळे आपणही वरिष्ठांचा मान राखण्यासाठी एबी फॉर्म दाखल केलेला नाही. त्यामुळे आपण या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलो आहे. आता केसरकर यांचा पराभव करणार असल्याचे सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Rajan Teli has AB form of BJP but not filled