Vidhan Sabha 2019 : पुरुषांपेक्षा ठरणार महिला वरचढ 

Vidhan Sabha 2019 : पुरुषांपेक्षा ठरणार महिला वरचढ 

रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्याची अंतिम पुरवणी मतदार यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 13 लाख 10 हजार 555 मतदार आहेत. 6 लाख 27 हजार 793 पुरुष, तर 6 लाख 82 हजार 752 महिला मतदार आहेत. जिल्ह्यातील 1703 मतदान केंद्रावर 11 हजार 048 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून 173 केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये 10 तृतीयपंथी आहेत. दापोली एक व रत्नागिरीत 9 मतदार आहेत. सर्व्हिस व्होटरची संख्या 842 आहे. त्यामध्ये 820 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश आहे. पोलिस यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 101 जोखीमग्रस्त मतदान केंद्र आहेत. दापोलीतील 1 केंद्र संवेदनशील आहे. ग्रामीण भागात एका ठिकाणी दोनपेक्षा जास्त केंद्र असणाऱ्या व शहरी भागात एका ठिकाणी 4 पेक्षा जास्त केंद्र असणाऱ्या 142 केंद्रांवर मायक्रो निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी नेटवर्क नाही, अशा ठिकाणी पोलिसांना संपर्कासाठी किंवा अत्यावश्‍यक बाब म्हणून वॉकी-टॉकीचा वापर करण्यात येईल. काही अडचण आल्यास किंवा मशिन बंद पडल्यास त्याचा उपयोग होणार आहे. 

14 कर्मचारी वारंवार गैरहजर, बजावली नोटीस 
निवडणूक प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडावी, यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र, 238 कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर राहिले. त्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी म्हणाले, मला त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवायचे नाही. त्यांच्याकडून काम करून घ्यायचे आहे. मात्र, लोकसभेला गैरहजर राहणारे काही कर्मचारी या वेळीही गैरहजर राहिले आहेत. असे 14 कर्मचारी असून वारंवार गैरहजर राहणाऱ्या या लोकांवर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सुनील चव्हाण यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेपात... 
*101 जोखमीग्रस्त मतदान केंद्र 
* नेटवर्क नसलेल्या ठिकाणी पोलिसांना वॉकीटॉकी 
* 11 हजार 48 कर्मचाऱ्यांची नियुक्ती 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com