Vidhan Sabha 2019 : रत्नागिरीतील पाच मतदारसंघात भाजपचे 25 जण इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 August 2019

रत्नागिरी - आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात इच्छुकांपैकी सुमारे २५ जणांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. इच्छुकांची संख्या पाहता भाजपची ताकद वाढती आहे, हे यातून दिसत आहे. शिवसेनेसोबत युती होण्याची शक्‍यता असली तरीही भाजपने स्वबळाची तयारी ठेवली आहे.

रत्नागिरी - आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात इच्छुकांपैकी सुमारे २५ जणांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. इच्छुकांची संख्या पाहता भाजपची ताकद वाढती आहे, हे यातून दिसत आहे. शिवसेनेसोबत युती होण्याची शक्‍यता असली तरीही भाजपने स्वबळाची तयारी ठेवली आहे.

या मुलाखती आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी घेतल्या. भाजपचा जास्तीत जास्तीत जास्त जागांवर विजय व्हावा, याकरिता या वेळी चर्चाही झाली. भाजप-शिवसेना युती होणार असे चित्र असले तरी भाजपने महाराष्ट्रात सर्व जागांवर निवडणुका लढवण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्याच अनुषंगाने आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. या लांजा-राजापूर, रत्नागिरी, चिपळूण-संगमेश्‍वर, खेड-दापोली-मंडणगड, गुहागर या पाचही मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. यानंतर जिल्हा कोअर टीमची बैठक झाली. 

या टीममध्ये जिल्ह्यातील दहा ते बारा जण पदाधिकारी आहेत. ॲड. दीपक पटवर्धन हे भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ही पहिलीच बैठक झाली. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत आहे. 
भाजपला जिल्ह्यात जास्त जागा लढवायला मिळाव्यात, असे मत कोअर टीमने व्यक्त केले. भाजपला जास्तीत जास्त यश मिळेल यासाठी प्रयत्न करण्याकरिता नियोजन केले. या बैठकीनंतर परिवारातल्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी प्रमुख व्यक्ती भाजपच्या कामाचा आढावा घेतला.

नावे नंतर जाहीर होणार
भाजपमधून निवडणूक लढवण्यास अनेक इच्छुकांमध्ये जुन्या निष्ठावंतांसह नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आता कोणतीही नावे जाहीर केलेली नाहीत परंतु युतीच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष नावे जाहीर होण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेसोबत युती झाल्यास भाजपच्या वाट्याला दोन मतदारसंघ येण्याची शक्‍यता आहे. परंतु युती तुटल्यास सर्वच मतदारसंघात भाजपला उमेदवार द्यावे लागणार आहेत. त्याच्या तयारीसाठी लवकर मुलाखती घेण्यात आल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 BJP has 25 aspirants in five constituencies in Ratnagiri