Vidhansabha 2019 : सिंधुदुर्गात तीन जागांवर भाजपकडून 'हे' इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 September 2019

कणकवली मतदारसंघातून संदेश पारकर, अतुल रावराणे आणि प्रमोद रावराणे इच्छुक आहेत. कुडाळ मतदारसंघातून अतुल काळसेकर आणि बाबा मोंडकर तर सावंतवाडी मतदारसंघातून राजन तेली, राजेंद्र म्हापसेकर, स्नेहा कुबल आणि स्मिता आठलेकर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील तीन विधानसभा मतदारसंघातून नऊ जणांनी निवडणूक लढविण्यासाठी दावेदारी सांगितली आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली. 

श्री. जठार म्हणाले, कणकवली मतदारसंघातून संदेश पारकर, अतुल रावराणे आणि प्रमोद रावराणे इच्छुक आहेत. कुडाळ मतदारसंघातून अतुल काळसेकर आणि बाबा मोंडकर तर सावंतवाडी मतदारसंघातून राजन तेली, राजेंद्र म्हापसेकर, स्नेहा कुबल आणि स्मिता आठलेकर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत

"गत विधानसभेत शिवसेनेने 62 तर भाजपने 121 जागा जिंकल्या होत्या. या जागा वगळता उर्वरित जागांवर 50 - 50 टक्‍के असा आमचा युतीचा फॉर्म्युला आहे. त्याला शिवसेना कितपत मान्यता देते हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.'' 

- प्रमोद जठार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Nine activists wants candidature from BJP in Sindhudurg