

किल्याच्या ऐतिहासिक सौंदर्यात भर पडावी, ऐतिहासिक गोष्टींची पर्यटकांना माहिती होण्यासाठी एक शिवकार्य म्हणून हा तोफगाडा किल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आला आहे.
देवगड : शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती ब्रिगेड, तसेच किल्ले प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्यातर्फे किल्ले विजयदुर्ग येथे ऐतिहासिक धाटणीचा तोफगाडा स्थापित करण्यात आला. शिवभक्तांनी शिवगर्जना करीत परिसर दणाणून सोडला. किल्ले विजयदुर्ग (Fort Vijaydurg) अष्टशताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष रघुनाथराव धुळप यांच्या हस्ते तोफगाड्याचे पूजन करण्यात आले. विजयदुर्गला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी (Tourist) हे आणखी एक आकर्षण असणार आहे.