
संगमेश्वर, चिपळूण, गुहागर या परिसरात रानकुत्र्याचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. जंगल परिसरामध्ये हा प्राणी कळपाने राहतो. निसर्गाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावणारा प्राणी आहे.
रत्नागिरीः संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील वहाळाजवल चार कोळसुंद्यानी (रानकुत्रे) सांबरावर हल्ला केला. हा प्रकार जवळच असलेल्या ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर त्या सांबराच्या पिल्लाला वाचविले. ही घटना ता. २५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. जखमी अवस्थेत असलेल्या सांबराच्या (Sambar) पिल्लाला ग्रामस्थांनी वन विभागाकडे सुपूर्द केले आहे. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.