
पुन्हा एकदा काँग्रेसला सुगीचे दिवस आणून देण्याचा प्रयत्न करणार
'काँग्रेसला पोषक वातावरण असल्याने स्वतंत्रपणे लढणार'
ओरोस : जिल्ह्यात (Sindhudurg) २१ डिसेंबरला होत असलेल्या चारही नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहे. चारही नगर पंचायतीच्या सर्व १७ जागांवर काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे, असे सांगतानाच निवडणुकीसाठी जिल्ह्यात काँग्रेसला (congress) पोषक वातावरण आहे, असा दावा काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख (vinayak deshmukh) यांनी केला आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जैतापकर कॉलनी येथे असलेल्या जिल्हा काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन देशमुख यांनी केले होते.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, विकास सावंत, विलास गावडे, साक्षी वंजारी, महेंद्र सांगेलकर, चंद्रशेखर जोशी, अरविंद मोंडकर, इरशाद शेख, विजय प्रभू, दादा परब, समिर वंजारी, विधाता सावंत, राजू मसुरकर, सुगंधा साटम, आनंद पवार, महेश अंधारी, मेघनाथ धुरी, स्मिता वागळे, सुंदरवल्ली पडीयाची, राघवेंद्र नार्वेकर, केतनकुमार गावडे, प्रदीप मांजरेकर, दादामिया पाटणकर, उल्हास मणचेकर, अभय शिरसाट होते उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपंचायत निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. १७ च्या १७ ही जागेवर काँग्रेस स्वतःचे उमेदवार उभे करणार आहेत. जिल्ह्यातील राजकीय वातावरण काँग्रेस पक्षाला पोषक आहे. दर महिन्याला एक दिवस काँग्रेसचा मंत्री जिल्ह्यात येईल आणि प्रश्न सोडवतील तसेच जनतेचे प्रश्न जाणून घेतील. सहकार क्षेत्रातील निवडणूकीत कोणती भूमिका घ्यायची याबाबत विचार चालू आहे. जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा नंबर वन बनेल, असा विश्वास आहे. काँग्रेसचे चिन्ह घराघरात जाण्यासाठी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला सुगीचे दिवस आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत भक्कम उभा राहणार आहे. येणारे दिवस काँग्रेस पक्षाचे असतील."