
व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञान समाज आणि मानवी कल्याणासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. त्याचा योग्य वापर केल्यास शिक्षण, आरोग्यसेवा आणि उद्योगक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडतील; मात्र, यासोबत येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी संतुलित दृष्टिकोन आणि तांत्रिक सुधारणा आवश्यक आहेत. योग्य नियोजन आणि जागरूकतेसह व्हीआर तंत्रज्ञान भविष्यकाळात समाजासाठी वरदान ठरू शकते. व्हर्च्युअल रिअॅलिटीचा उपयोग भविष्यात विविध क्षेत्रांमध्ये वाढत जाणार आहे. आरोग्य, शिक्षण, मनोरंजन आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी हे तंत्रज्ञान अधिक संधी निर्माण करेल. इच्छुकांनी या क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करून स्वतःला या प्रगतीशील क्षेत्रात सिद्ध करावे.
- प्रा. क्रांती गजमल, लवेल-खेड