esakal | रत्नागिरीत ग्रामीण पेक्षा शहरात कोरोनाचा कहर सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Visit the homes of patients in all containment zones to prevent the spread of corona

खेर्डी, मिरजोळी आणि कापसाळ हॉट स्पॉट झाल आहेत. अलोरे,कोळकेवाडी, पेढे परशुराम येथेही मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळळे. 

रत्नागिरीत ग्रामीण पेक्षा शहरात कोरोनाचा कहर सुरूच

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : गेल्या सहा महिन्यांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. रत्नागिरी जिल्हा सुद्धा त्यापासून लांब राहू शकला नाही. चिपळूण तालुक्यातील पाली येथे मुंबईहून आलेला तरूण पहिला कोरोनाचा रूग्ण ठरला तेव्हापासून सुरू झालेला कोरोना बाधितांचा आकडा आज चिपळूण तालुक्यात हजारी पार गेला आहे. ग्रामीण पेक्षा शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. 


प्रशासन, पोलिस यंत्रणा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी झटली. मात्र तिसर्‍या टप्यात लॉकडाऊन ओपन झाला आणि पुणे मुंबईकर गावात आले. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा फार प्रसार झाला नाही मात्र शहरात कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला. कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर पेढांबे कॉलेज ताब्यात घेवून तेथे संशयितांचे क्वारंटाईन करण्यात आले. बाधितांवर कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू झाले. मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांमुळे त्यांचे नातेवाईक कोरोना बाधित झाले. नंतर अत्यावश्यक सेवेसाठी झटणारे डॉक्टर, पोलिस, शासकीय कर्मचारीही कोरोना बाधित झाले. रूग्णालयात काम करणार्‍या नर्स यांच्यासह फिरतीवर असणार्‍या आशा सेविकांनाही कोरोनाची बाधा झाली. शहरातील सर्वच भागात कोरोना पसरला आहे. उपनगरात खेर्डी, मिरजोळी आणि कापसाळ हॉट स्पॉट झाल आहेत. अलोरे,कोळकेवाडी, पेढे परशुराम येथेही मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळळे. 

हेही वाचा- कणकवली बसस्थानकाचे आधुनिकीकरण; आंब्यांची पूर्ण क्षमतेने वाहतूक... कुणी दिली ही आश्वासने... वाचा -

शहरी भागात कोरोनाचे सर्वाधिक 150 रूग्ण बाधित आहेत. 372 रूग्ण उपचार घेवून बरे झाले आहेत. ग्रामीण भागात 135 कोरोना बाधीत उपचार घेत आहेत. 334 रूग्ण उपचार घेवून बरे झाले आहेत. आतापर्यंत तीस जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला यातील सर्वाधिक 19 रूग्ण शहरातील भागातील आहेत. 11 ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत 1021 कोरोना बाधित आढळले. 706 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 285 रूग्ण उपचार घेत आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के आहे. 

हेही वाचा-सिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांची संख्येने हजारांचा टप्पा ओलांडला

कोरोनाचा समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व कन्टेन्मेंट झोनमदील रूग्णांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकांमार्फत थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटरद्वारे आरोग्य तपासमी केली जात आहे.

नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top