Social Service Village : सुकळवाडमध्ये ‘माणुसकीची भिंत’; देणाऱ्याला आनंद, घेणाऱ्याला आधार

Gram Panchayat Welfare : गरजूंना मदत करण्यासाठी सुकळवाडमध्ये ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरू झाला आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
helping poor community

helping poor community

sakal

Updated on

मालवण : भारतीय संस्कृतीमध्ये दानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘आपल्याकडे जे जास्त आहे ते दुसऱ्याला द्यावे’ या उदात्त भावनेतून आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने, सुकळवाड (ता. मालवण) येथे ‘माणुसकीची भिंत’ हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री पंचायतराज अभियान समिती सदस्य आणि सुकळवाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे उद्‍घाटन शनिवारी सुकळवाड बसस्थानक येथे झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com