"जसे पाणी बंद केले, तसे वीजही बंद करू"

warning was given to the railway administration by Shaukat Mukadam chairman of the Konkan Railway Injustice Redressal Committee
warning was given to the railway administration by Shaukat Mukadam chairman of the Konkan Railway Injustice Redressal Committee
Updated on

चिपळूण : कोकण रेल्वे विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच रेल्वे विजेवर धावणार आहे. मात्र, येथील अनेक प्रश्‍न रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. ते प्रश्‍न प्रथम मार्गी लावा. अन्यथा, आमची हक्काची कोयना आणि एन्‍रॉनची वीज आम्ही कोकण रेल्वेला देणार नाही. जसे पाणी बंद केले, तसे वीजही बंद करून टाकू, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. 


रेल्वे प्रशासनास शौकत मुकादम यांनी पत्र पाठवून हा इशारा दिला आहे. मुकादम यांनी म्हटले आहे, की कोकण रेल्वेमुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कोकणच्या विकासासाठी ते गरीब शेतकऱ्यांनी सोसले. रेल्वे प्रशासनाने कोकणाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. 80 कोकणी तरुणांची नोकरीची मागणी प्रलंबित आहे. चिपळूण ते सीएसटी अशी स्वतंत्र पॅसेंजर गाडीच्या  मागण्या दुर्लक्षित आहे. चिपळूण रेल्वे स्थानक जंक्‍शन घोषित करून येथे एक्‍स्प्रेस गाड्यांना थांबा द्यायला हवा.

चिपळूण रेल्वे स्थानकावरील फ्लाट क्रमांक 2 वर तिकीट खिडकीची मागणी प्रलंबित आहे. येथील जनतेच्या पूर्वजांच्या त्यागाने कोयना धरणाची निर्मिती केली. ती महाराष्ट्र आणि कोकणाच्या विकासासाठी गोवा आणि मडगावला वीज देण्यासाठी नव्हे. कोयना आणि एन्‍रॉनची वीज ही आमच्या हक्काची आहे. कोकणात पाऊस कमी पडला तर विजेचा तुटवडा निर्माण होऊन लोडशेडिंग करावे लागते. जर रेल्वेला वीज दिली आणि भविष्यात आम्हालाच वीज कमी पडली तर हजारो उद्योगधंदे बंद पडून कोकणात बेरोजगारी वाढेल. त्यामुळे आमचे प्रश्‍न मार्गी लावा, अन्यथा जसे पाणी बंद केले तसे वीजदेखील बंद करू, असा इशारा मुकादम यांनी दिला. 
 
दृष्टिक्षेपात... 
कोकणी तरुणांची नोकरीची मागणी प्रलंबित 
चिपळूण ते सीएसटी पॅसेंजरची मागणी दुर्लक्षित 
चिपळूण ते कराड मार्गाचा प्रश्‍न स्थगित 
फ्लाट क्रमांक 2 वर तिकीट खिडकी नाही 
वीज कमी पडल्यास कोकणात बेरोजगारी 

 संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com