सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणाले, यासाठी धुणार फुटपाथ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

पालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक पावले उचलली असुन सायंकाळच्या वेळी नेहमी गजबजलेला मोती तलावाचा काठ व फुटपाथ स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणुन येथील पालिकेकडून मोती तलावाचा फुटपाथ एक दिवस आड पाण्याने धुण्यात येणार असुन त्याची सुरवात नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आली. 

पालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक पावले उचलली असुन सायंकाळच्या वेळी नेहमी गजबजलेला मोती तलावाचा काठ व फुटपाथ स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. तलावाच्या काठावर अनेक पर्यटन तसेच नागरिक सकाळच्या प्रहरी तसेच सायंकाळी विश्रांती घेत असतात. सध्या देशात कोरोनाचा वाजता धोका लक्षात घेता पालिकेकडून उपाययोजना राबविण्याबरोबर शासनाकडून आलेल्या सूचनांचे पालनही केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन मोती तलावाचा काठ धुण्याचा एक महत्वपूर्ण पाऊल पालिकेने उठलेले असुन त्याचा शुभारंभ नगराध्यक्ष परब यांच्या हस्ते झाला.

यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, नगरसेवक परिमल नाईक, राजू बेग, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, उत्कर्षा सासोलकर, माधुरी वाडकर, समृध्दी विर्नोडकर, भारती मोरे, दिपाली भालेकर, पालिका कर्मचारी आसावरी केळबाईकर, रसिका नाडकर्णी, देवीदास आडारकर, दीपक म्हापसेकर आदी उपस्थित होते. 
शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही स्वच्छता एक दिवस आड दररोज करण्यात येणार असुन रात्रीच्या वेळी घोळक्‍याने तलावाच्या काठावर असणाऱ्यावरही कारवाई केली जाणार असुन तलावाच्या काठावर घोळक्‍याने बसु नका तसेच गरज असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन नगराध्यक्ष परब यांनी केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Washing Of Moti Talav Footpath Sunju Parab Comment