esakal | भाजपला दे धक्का! वाटद ग्रापंचायत पुन्हा सेनेच्या ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Watad Gram Panchayat again under the control of ShivSena kokan political marathi news

कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा आपला राजकीय करिष्मा दाखवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी अतिशय प्रतिष्ठेची केलेली वाटद ग्रामपंचायत आयत्यावेळी सेनेच्या हातातून गेली होती; मात्र

भाजपला दे धक्का! वाटद ग्रापंचायत पुन्हा सेनेच्या ताब्यात

sakal_logo
By
राजेश शेळके


रत्नागिरी : कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा आपला राजकीय करिष्मा दाखवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी अतिशय प्रतिष्ठेची केलेली वाटद ग्रामपंचायत आयत्यावेळी सेनेच्या हातातून गेली होती; मात्र सेनेने भाजपला पुन्हा धोबीपछाड देत सरपंच अंजली विभुते यांनी सामंत यांच्या उपस्थितीत दोन महिन्यातच स्वगृही परतत भाजपला ठेंगा दाखवला. त्यामुळे तालुक्यातील आणखी एक ग्रामपंचायत सेनेच्या पारड्यात पडली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाटद ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. सरपंच निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला. या ग्रामपंचायतीमधील 11 पैकी 7 जागा सेनेकडे तर 4 जागा भाजपकडे आल्या. वाटद ग्रामपंचायतीमध्ये काठावरचे बहुमत असताना भाजपने या ठिकाणी करिश्मा करून दाखविला. शिवसेनेचे दोन सदस्य भाजपच्या गळाला लावले आणि त्यांच्या मदतीने या ग्रामपंचायतीवर भाजपने कब्जा मिळविला. सेनेकडे अनेक वर्षांपासून असलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंचपदी अंजली विभुते तर उपसरपंचपदी सुप्रिया नलावडे या विराजमान झाल्या.

हेही वाचा- कोल्हापुरात कोरोना टेस्ट सक्तीची: रिपोर्ट निगेटिव्ह तरच एंट्री;जिल्हाधिकारी देसाई यांचे आदेश

हक्काची ग्रामपंचायत गेल्याने हा बदल सेनेच्या वर्मी लागला होता. तेथे पुन्हा काहीतरी करिश्मा घडविण्याचा प्रयत्न होता.
त्यानुसार मंत्री उदय सामंत, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी आपली रणनीती वापरून अवघ्या दोन महिन्यात अंजली विभूते यांना स्वगृही परत आणले. त्यामुळे वाटद ग्रामपंचायतीवर पुन्हा सेनेची सत्ता स्थापन झाली. सेनेच्या या रणनीतीने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मी यापूर्वीच शब्द दिला होता. थोडे दिवस थांबा. तालुक्यात उर्वरित चार ग्रामपंचायतींपैकी काहींवर सेनेचा भगवा फडकणार. तो पूर्ण केला असून वाटद ग्रामपंचायत पुन्हा सेनेच्या ताब्यात आणली आहे.
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री

संपादन- अर्चना बनगे

loading image