esakal | चांदेराई बाजारपेठेत पाणीच पाणी ; भरती वेळी पाणी वाढण्याची शक्यता..
sakal

बोलून बातमी शोधा

Water in Chanderi market since yesterday morning Flood to the root river

पावसाचे पाणी खूप वेगाने वाढत असल्याने चांदेराई, हरचिरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चांदेराई बाजारपेठेत पाणीच पाणी ; भरती वेळी पाणी वाढण्याची शक्यता..

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी :  दोन दिवसापासुन वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काजळी नदीला महापूर आला असून चांदेराई बाजारपेठेत काल पहाटेपासून पाणी भरण्यास सुरवात झाली. 24 तास होऊन गेले तरी बाजारपेठेतील पाणी कमी झालेले नाही. पावसाचे पाणी खूप वेगाने वाढत असल्याने चांदेराई, हरचिरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थ संकटात सापडले आहेत.

हे ही वाचा - अर्जुना नदीवर ब्रिटिशकालीन पूल धोकादायक  : शेकडो वाहने आणि चाकरमानी राजपूरला अडकले...

काल सकाळपासुन चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत पाण्याची पातळी वाढतच होती. मात्र ओहोटीच्या वेळेस म्हणजे रात्री 1 वाजल्यानंतर थोडे पाणी कमी झाले. परंतु रात्रभर पडलेल्या पावसाच्या जोरामुळे आज पहाटे 6 वाजल्यापासुन पाणी पातळीत वाढ झाली असल्याचे चांदेराई गावचे माजी सरपंच दादा दळी यांनी सांगितले. 

हे ही वाचा - दोडामार्ग तालुक्‍यातील  `हे` पूल पाण्याखाली...

दोन दिवसापूर्वी विद्युत प्रवाह खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.  महावितरणने भोके मार्गे विद्युत प्रवाह तात्काळ सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 
भरतीची वेळ नसताना बाजारपेठेत पाणी वाढतं आहे. त्यामुळे भरतीची वेळ दुपारी 2 च्या दरम्यान असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. कोळंबे-परचुरी पुलावरून पाणी गेल्याने परचुरी गावाचा संपर्क तुटला आहे.बुधवारी सकाळी बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली. बावनदीच्या पुराचे पाणी कोळंबे-परचुरी पुलावरून वाहू लागले. कोळंबे-परचुरीला जोडणारा पुलच पाण्याखाली गेल्याने परचुरी गावाचा संपर्क तुटला होता. परचुरीतील अनेक ग्रामस्थ गावात अडकून पडले आहेत. 
 

संपादन - स्नेहल कदम

loading image