३२ कि. मी. मध्ये झिरपले ४ लाख घनमीटर पाणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 May 2019

रत्नागिरी - महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाने विकत घेतलेले ५ लाख घनमीटर पाण्यापैकी ३२ कि.मी.च्या प्रवासात ४ लाख घनमीटर पाणी वाटेतच झिरपले. एमआयडीसीच्या पदरात अवघे १ लाख घनमीटरच पाणी पडले. यासाठी १४ लाख खर्च केले होते. ७ जूनपर्यंत पाऊस पडला नाही तर ५० टक्के कपात केली जाईल, १० जूनपर्यंत पाऊस पडला नाही तर दिवसाआड पाणी करण्याची वेळ एमआयडीसीवर येणार आहे.

गेल्या वर्षी २५ टक्के कपातीपर्यंत हा विषय थांबला होता. मात्र, यंदा बिकट परिस्थिती आहे. दरदिवशी ९ एमएलडी पाणी उचलावे लागते. तालुक्‍यातील ९ ग्रामपंचायती, रत्नागिरी पालिका, उद्योग, इतर ग्राहक आदींना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. मात्र, या भीषण पाणी टंचाईत पाणीपुरवठा करताना एमआयडीसीची दमछाक होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाटबंधारे विभागाला १४ लाख रुपये भरून शिपोशी धरणातील ५ लाख घनमीटर पाणी विकत घेतले. काजळी नदीचा तब्बल ३२ कि.मी.चा प्रवास होता. 

८० टक्के पाणी वाया 
अकरा दिवसाचा प्रवास करीत शिपोशीचे पाणी हरचेरी धरणात आले. ४० टक्के पाणी प्रवासात झिरपून ६० टक्के पाणी एमआयडीसीच्या पदरात पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र योग्य नियोजन न झाल्याने व काजळी नदीत ठिकठिकाणी पाणी अडविल्याने ८० टक्के पाणी वाया गेले. केवळ २० टक्के म्हणजे १ लाख (लाख घनमीटर) पाणीच एमआयडीसीच्या पदरात पडले. 

ग्राहकांच्या सोयीसाठी १४ लाख खर्च करून ५ लाख लाख-घनमीटर पाणी विकत घेतले. काजळी नदीच्या प्रवासातच ४ लाख लाख घनमीटर पाणी झिरपले. हरचेरी धरणात सुमारे १ लाख लाख-घनमीटर पाणीच आले. ७ तारखेपर्यंत पाऊस नाही पडला तर ५० टक्के पाणी कपात करावी लागेल. 
- बी. एन. पाटील,

       एमआयडीसी वरिष्ठ अधिकारी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water leakage issue in Ratnagiri MIDC