esakal | निकृष्ट कामाचा नमुना; महामार्गावरच साचले तळे
sakal

बोलून बातमी शोधा

Water stagnant on the highway in Talere

गेले दोन दिवस मुसळधार पाऊस असल्याने येथे महामार्गावरच पाणी साचल्यामुळे त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

निकृष्ट कामाचा नमुना; महामार्गावरच साचले तळे

sakal_logo
By
नेत्रा पावसकर

तळेरे (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे; मात्र अपूर्ण कामे मंद गतीने सुरू असल्याने त्याचा नाहक फटका या ठिकाणांच्या वाहनचालकांना तसेच नागरिकांना बसत आहे. गेले दोन दिवस मुसळधार पाऊस असल्याने येथे महामार्गावरच पाणी साचल्यामुळे त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

महामार्गावरील तळेरे बसस्थानकासमोरील चौपदरीकरणाच्या कामाच्या निमित्ताने उड्डाणपुलासाठी पिलरचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती काढण्यात आली आहे; पण ती माती योग्य ठिकाणी टाकली नसल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी एकत्र होऊन साठत आहे. या पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पर्याय नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून महामार्गाचे रूपांतर तलावात झाल्याचे दिसते. अशा परिस्थितीमुळे कोल्हापूरच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत मनस्ताप सहन करावा लागत आहे. नाईलाजास्तव या साचलेल्या पाण्यातून अंदाज घेत वाहनचालक वाहने हाकताना दिसतात. 

अजून किती प्रतीक्षा? 
कासार्डे पुलाचे अर्धवट काम पूर्ण होण्यासाठी प्रवाशांना अजून किती वाट पाहावी लागणार असाही प्रश्‍न वाहनचालक, प्रवासी व ग्रामस्थ विचारत आहेत. तळगाव ते कलमठ टप्प्यातील 38 किलोमीटरच्या टप्प्याचे 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक काम झाले आहे; पण तळेरे, कासार्डे व नांदगावमधील उड्डाणपुलांची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top