रत्नागिरी जिल्ह्यातील चौदा गावांचे पाणी कोणत्याही क्षणी बंद; कारण काय? 

Water Supply Of 14 Villages In Ratnagiri Will Stop Any Time
Water Supply Of 14 Villages In Ratnagiri Will Stop Any Time
Updated on: 

रत्नागिरी - सुमारे 14 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारी जयगड प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. योजनेची पाणीपट्टी 94 लाख असताना फक्त 2 लाख म्हणजे अवघे 2 टक्के वसुली झाली आहे. जिल्हा परिषदेनेही पाणीपट्टी भरण्यास नकार दिल्याने थकबाकीवरून महावितरण कंपनी कधीही वीज जोडणी तोडण्याची शक्‍यता आहे. 

एक नजर

  • जिल्हा परिषदेचे पाणीपट्टीबाबत हात वर 
  • पाणीपट्टी वाढ आणि थकबाकीचा वाद 
  • वीज जोडणी तोडण्याची शक्‍यता 
  • 14 ग्रामपंचायतीच्या सरपंचांची बैठक 

पंचायत समितीच्या मासिक बैठकीमध्ये हे सत्य ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने उघड केले. गेले काही दिवस जयगड प्रादेशिक पाणी योजनेच्या पाणीपट्टी वाढीवरून आणि थकबाकीचा वाद सुरू होता. पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्याने ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरण्यास नकार दिला होता. पाणीपट्टी न भरल्याने पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला होता. त्यानंतर पाणीपट्टी कमी करून काही महिने सामोपचाराने 14 ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा सुरू होता. मात्र आजच्या बैठकीमध्ये योजनेचे भवितव्य अंधारात असल्याचे स्पष्ट झाले. 

थकीत वीजबिलामुळे योजना पडणार बंद

सभागृहात संबंधित विभागाचे अधिकारी म्हणाले, जयगड प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला महिन्याला साधारण तीन लाखाच्या दरम्यान वीजबिल येते. वर्षाची पाणीपट्टी सुमारे 94 लाख आहे. ग्रामपंचायतींच्या पाणीपट्टीतून हे बील भरले जाते. मात्र आतापर्यंत फक्त 2 लाख रूपये बिल भरण्यात आले. म्हणजे केवळ 2 टक्के पाणीपट्टी वसूल झाली. जिल्हा परिषदेनेही वीजबिल भरण्यास नकार दिल्याने थकीत वीजबिलामुळे ही योजना कधीही बंद पडण्याची शक्‍यता आहे. 

सरपंचांची लवकरच बैठक 

नोव्हेंबर अखेर फक्त 2 टक्के पाणीपट्टी वसूल झाल्याने 14 ग्रामपंचायतीच्या सरपंचांची बैठक बोलावण्याचा निर्णय पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. बैठकीमध्ये पाणीपट्टी वसूल करून योजना बंद पडणार नाही याची खबरदारी घेऊ असा प्रयत्न केला पाहिजे, असे मत सदस्य गजानन पाटील यांनी व्यक्त केले. त्याला सभापती पाटील यांनी संमती दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com