Pali A significant amount of water is being wasted due to leakage.
sakal
पाली - एकतर्फी पाणी कपात आणि दुसरीकडे प्रशासकीय दुर्लक्ष अशी संतापजनक परिस्थिती सध्या पाली शहरात पाहायला मिळत आहे. एकीकडे पाली नगरपंचायतीकडून नागरिकांना 'पाणी वाचवा, पाणी जपून वापरा' असे आवाहन केले जात आहे आणि दर मंगळवारी शहरात पाणी कपातीचा निर्णय लादला गेला आहे; तर दुसरीकडे याच नगरपंचायतीच्या मुख्य जलवाहिनीतून रोज हजारो लिटर शुद्ध पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून जात आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पालीकरांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.