आघाडी सरकारच्या 15 वर्षापेक्षा जास्त काम पाच वर्षात केले - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

आघाडी सरकारच्या काळातील पाच वर्षापेक्षा मागील युती सरकारच्या काळातील पाच वर्षात जास्त काम झाले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  पेणमधील रवींद्र पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

रायगड - आघाडी सरकारच्या काळातील पाच वर्षापेक्षा मागील युती सरकारच्या काळातील पाच वर्षात जास्त काम झाले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  पेणमधील रवींद्र पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पेणचे आमदार रवींद्र पाटीलच होतील, समीर कुणीच नाही, निवडणुकीत मजाच नाही, राहुल गांधी बँकॉकला गेले पवारांचं म्हणजे अर्धे इधर अर्धे उधर जावो असं झालंय, तर शेतकरी कामगार पक्षाचा मायक्रोस्कोपने शोध घ्यावा लागेल. तसेच, 4 दिवसांपूर्वी आघाडीने जाहीरनामा काढला, त्यामध्ये ते दोन गोष्टी लिहायला विसरले असावेत, की सत्तेत आलो तर ताजमहाल देऊ, आश्वासने देण्यापेक्षा 15 वर्षांच्या कामाचा हिशोब द्या, अधिक काम 5 वर्षात झालं आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शेतकऱयांना 50 हजार कोटी दिले, वर्षाला 10 हजार कोटी दिले, भाताच्या खरेदी करिता 200 ते 500 रुपये बोनस दिला, मुंबई गोवा रस्ता वेगाने पूर्ण करणार असून 97 टक्के भूसंपादन दीड वर्षात पूर्ण होईल, हा रस्ता कोकणची जीवनवाहिनी असेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. रायगड औद्योगिक जिल्ह्यातील उद्योग वाढवताना पर्यावरण, पर्यटन जपायचं असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अवधूत तटकरे, अनिल तटकरे, उमेदवार रविंद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर आणि महेंद्र दळवी यांच्यासह स्थानिक उपस्थित होते. यावेळी रविंद्र पाटील म्हणाले की, मतदार संघाला झुकते माप मिळणार, शेकापला सापासारखे चिरडून टाकलं पाहिजे ते कामापूरता उपयोग करतात. काही बूथ संवेदनशील आहेत तिथं यंत्रणा हवी. 10 वर्षात काही झालं नाही, या सरकारच्या माध्यमातून विकास गंगा आणू असा विश्वासही पाटील यांनी यावेळी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we did better job than ncp and Congress government says Cm fadanvis