...तर राणेंना संघ, भाजपच्या मुशीत घडवलं जाईल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

कणकवली - भारतीय जनतापक्षावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत. त्यामुळे राणे भाजपत आले, तर पक्ष बिघडणार नाही तर राणेंना संघ व भाजपच्या मुशीत घडवलं जाईल. तसंच जे भाजपमध्ये येतात, त्यांचं नाणार प्रकल्पाला निश्‍चितपणे समर्थन असतं, अशी स्पष्टोक़्ती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली.

कणकवली - भारतीय जनतापक्षावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत. त्यामुळे राणे भाजपत आले, तर पक्ष बिघडणार नाही तर राणेंना संघ व भाजपच्या मुशीत घडवलं जाईल. तसंच जे भाजपमध्ये येतात, त्यांचं नाणार प्रकल्पाला निश्‍चितपणे समर्थन असतं, अशी स्पष्टोक़्ती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली.

येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन श्री. जठार यांनी आपली भूमिका मांडली. या वेळी वाहतूक आघाडीचे शिशिर परुळेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, आरोग्य आघाडीचे अरविंद कुडतरकर आदी उपस्थित होते.

श्री. जठार म्हणाले, ‘‘माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना भाजपमध्ये घ्यायचं किंवा नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नुकतीच कणकवली व रत्नागिरीत आली होती. रत्नागिरी येथे राणेंच्या भाजप प्रवेशाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली.

यावेळी राजन तेली, सदा ओगले, संदेश पारकर, अतुल रावराणे, अतुल काळसेकर यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राणेंबाबत आपापल्या भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या होत्या. आता मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावाच लागेल. 

श्री. जठार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या पक्षप्रवेशबाबत योग्य वेळी निर्णय जाहीर करू, अशी भूमिका स्पष्ट केलीय. तर भाजप प्रदेश कार्यकारिणीही बैठक होत आहे. त्यामुळे पुढील एक दोन दिवसांत राणेंच्याबाबतचा निर्णय होईल. त्यांना एकतर पक्षात घेतील किंवा घेणारच नाहीत; मात्र पुढील दोन दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.’’

बंडखोरी केल्यास तेलींना त्रास 
सावंतवाडी मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आहे. जर युती झाली तर या मतदारसंघातून राजन तेली यांना निवडणूक लढता येणार नाही. युती असताना जर त्यांनी बंडखोरी केली, तर त्यांना निश्‍चित त्रास होईल, असा इशारा देखील श्री.जठार यांनी दिला.

राणे आम्हाला हवेत किंवा नकोत...
श्री. जठार म्हणाले, राणे आम्हाला हवेत किंवा नकोत, हा प्रश्‍नच आता उरलेला नाही. पक्षाला वाटलं तर ते राणेंना घेतील आणि राणे पक्षात आले तर त्यांना घडविण्याचं काम आम्ही करू.

पारकरांचं भाजपमधील वय काय?
राणेंना भाजपत घेतले तर पक्ष बिघडेल, अशी भीती युवा नेते संदेश पारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्‍त केली होती. यावर बोलताना पारकरांचे भाजपमधील वय काय? असा प्रश्‍न श्री. जठार यांनी केला. तसेच, कुणाच्या येण्याने भाजप बिघडणार नाही, तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करू. भाजपमध्ये आलेले कुणीही बिघडलेले नाही, असेही श्री. जठार यांनी नमूद केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we will develop Narayan Rane with BJP style