

Farmers in rural areas struggle to protect crops amid wildlife threats after weapon deposit orders.
sakal
सावंतवाडी : निवडणुकीच्या काळात परवानाधारक बंदुका जमा करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने परवानाधारकांची योग्य पडताळणी करून शेती संरक्षणासाठीच्या बंदुका शेतकऱ्यांकडेच ठेवाव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांनी केली आहे.