‘तारली’ कोकण किनारपट्टीवर परतली!

२०१७ पासून स्थलांतरित; पाच वर्षांनंतर पुन्हा जाळ्यात, मच्छीमार खूश
weather update Tarli fish found in large numbers on the konkan coast
weather update Tarli fish found in large numbers on the konkan coastsakal
Updated on

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात सापडणारा तारली मासा वातावरणातील बदल, चक्रीवादळ, तुटलेली अन्नसाखळी आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मासेमारीमुळे स्थलांतरित झाला होता. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा या प्रजातीचे मासे मिळू लागले आहेत. महिनाभरापासून कोकण किनापट्टीवर मच्छीमारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात ‘तारली’ सापडू लागली.

वाढत्या उष्म्याचा समुद्री जिवांवर अजून तेवढा परिणाम झालेला नसल्याचे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एक जमेची बाजू म्हणजे २०१७ पासून कोकण किनारपट्टीवरून स्थलांतरित झालेला तारली मासा पाच वर्षांच्या प्रवासानंतर पुन्हा या भागात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांना दर्जेदार मासळी सापडली नाही, तरी ‘तारलीने तारले’ असे म्हणता येणार आहे. सध्या या व्यवसायावर मोठा परिणाम झाला.

औषधी गुणधर्मयुक्त

तारली मासा खाण्यासाठी वापरतात. त्याचवेळी या माशापासून चांगल्या दर्जाचे तेल मिळते. ‘ओमेगा-३’ हा घटक असणारे हे तेल औषधी आहेच. या तेलापासून साबण, रंगही तयार करतात. या तेलाचा मार्गारीन, पेंट्स, वॉर्निश आणि लिनोलियम तयार करण्यातही वापर होतो. तेल वेगळे केल्यावर उरलेल्या भुकटीचा वापर पशु-पक्ष्यांच्या खाद्यात पूरक घटक म्हणून करतात. ही भुकटी काही कारणाने खराब झाली, तर तिचा खत म्हणूनही उपयोग केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून या माशाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

कोकण किनापट्टीवर उष्म्याचा समुद्री जिवांवर अजून तेवढा परिणाम झालेला नाही. मात्र, एक चांगली गोष्ट म्हणजे पाच वर्षांपूर्वी किनारपट्टीवरून स्थलांतरित झालेला तारली मासा पुन्हा मच्छीमारांना मिळू लागला आहे.

- एम. व्ही. भादुले, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त, रत्नागिरी

मोठ्या प्रमाणात कोकण किनारपट्टीवर थव्याने मिळणारा तारली मासा गेला काही काळ मिळत नव्हता. आता तो मिळू लागला; परंतु पहिल्यासारखा नाही.

- राजन सुर्वे, पारंपरिक मच्छीमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com