mumbai goa highway traffic
sakal
पाली - सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने रायगड, तळकोकणात व गोव्याला जाण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. परिणामी शनिवारी (ता. 24) मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर पाली शहरात देखील वाहतूक कोंडी झाली होती. पर्यटक व प्रवासी यांना या कोंडीने बेजार झाले होते.