दुसऱ्या दिवशीही खारेपाटणमध्ये शांतता

weekend lockdown impact kharepatan konkan sindhudurg
weekend lockdown impact kharepatan konkan sindhudurg

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - विकेंड लॉकडाउनला सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील एसटी आगारात आज एकही बस आली नाही. तसेच रिक्षा व्यावसायिक, खासगी वाहन चालकही शहरात दिसले नाहीत. मुंबई- गोवा महामार्गावरही आज शुकशुकाट होता. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाऊनला खारेपाटणवासीयांनी दुसऱ्या दिवशीही पाठींबा दिला. नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. फक्त सुखनदीवरील पुलाचे काम सुरू होते.

खारेपाटणच्या चेकपोस्टवरही केवळ वाहन आणि आतील प्रवाशांची नोंद घेतली जात असल्याने चेकपोस्टवर गर्दी नव्हती. दरम्यान, खारेपाटण शहरातील एक कोरोना बाधित राजस्थानमध्ये पळून गेल्याबाबतची चर्चा होती. शहराबरोबर खारेपाटणलगतच्या दशक्रोशीतूनही विकेंड लॉकडाऊनला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज दुसऱ्या दिवशीही राजापूर आगरातून सागरी महामार्गाकडे कातळी - नाणार खारेपाटणमधून जाणाऱ्या मार्गावरील सेवा बंद होत्या. तर देवगड आगरातून पडेल, विजयदुर्ग, वाघोटन, खारेपाटण याही बसेस बंद होत्या. तसेच वैभववाडी, कणकवली या आगरातून खारेपाटण शहरात बसेस आल्या नाहीत. दरम्यान शहरातील रामेश्वरनगर, कर्लेवाडी, कोष्टीआळी या भागात कोरोना रूग्ण असल्याने तेथील परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांची आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com