डॉ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी सूत्रधारांना केव्हा पकडणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dabholkar

डॉ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील सूत्रधारांना केव्हा पकडणार?

पाली : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खूनाला शुक्रवारी (ता.20) आठ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या खूनाच्या सूत्रधारांचे काय झाले? त्यांना कधी पकडणार? असा सवाल करत डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या सूत्रधारांचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रायगड जिल्हा अंनिसने आज केली आहे.

या संदर्भातील निवेदन शुक्रवारी (ता.20) रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये डॉ.विरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे आणि मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून आरोपपत्र दाखल केलेले आहे. तर अमोल काळे या संशयित आरोपीविरूद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही.

हेही वाचा: Blog: नरेंद्र दाभोलकर यांचे तालिबानीच्या 'त्या' पत्राला प्रत्युत्तर

तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपीविरूद्धही सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखलच करण्यात आलेले नाही. या खूनाचा तपास डॉ. विरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत थांबलेला आहे. या खूनामागील सूत्रधार कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून मागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे.

अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही. यासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनामागील सूत्रधारांचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. या वेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा: पुण्यासह जिल्हयात दुसऱ्या डोसला प्राधान्य देणार : अजित पवार

यावेळी अंनिस रायगडचे जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, जिल्हा प्रधान सचिव संदेश गायकवाड, जातीअंत विभाग राज्य सदस्य निलेश घरत, महिला विभाग राज्य सदस्य मीना मोरे, मंदाकिनी गायकवाड, श्वेता सुभेकर हे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फलक दाखवून घोषणा दिल्या.

Web Title: When Will The Masterminds Of Dr Narendra Dabholkar Murder Case Be

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raigad