
रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 3) सायंकाळपासून 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 696 झाली आहे. मात्र ज्या पद्धतीने कोरोनाने शासकीय, निमशासकीय यंत्रणेंमध्ये शिरकाव केला आहे, त्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी धास्तावले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज आणखी 13 रुग्ण वाढले आहेत. जिल्हा कोविड रुग्णालयातून एक रुग्ण बरा झाला. अशांची संख्या 461 झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये चिपळूण-कामथे येथील तीन, राजापूर येथील एक, रत्नागिरी येथील दोन, लांजा येथील एक, खेड-कळंबणी येथील पाच, दापोली येथील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या 209 आहे.
जिल्ह्यात सध्या 49 कन्टेन्मेंट झोन आहेत. संस्थात्मक विलगीकरणात कक्षामध्ये 61 संशयित रुग्ण आहेत. मुंबईसह इतर जिल्ह्यातून आलेल्या आणि आजअखेर होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 16 हजार 517 इतकी आहे. परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून एक लाख 65 हजार 388 व्यक्ती जिल्ह्यात दाखल आहेत.
संगमेश्वरात नव्याने चार पॉझिटिव्ह
संगमेश्वर तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यामध्ये प्राप्त झालेल्या अहवालानुसार चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये तुरळमधील पती-पत्नी, कनकाडीतील युवक व भोवडेतील एका तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे आता तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 120 इतकी झाली आहे.
तुरळ ब्राह्मणवाडीतील 58 वर्षीय पती व त्याची पत्नी 24 जूनला मुंबईहून गावी आले होते. त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर 29 रोजी त्यांचे स्वॅब नमुने घेतले. त्यांचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला असून, या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे पण वाचा -
दृष्टिक्षेपात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.